पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसासाठी बऱ्याच खेचाखेचीनंतर अखेर सत्ताधारी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. तर काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. त्यापैकी जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल.
Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा
By बाळकृष्ण परब | Updated: October 6, 2020 18:13 IST
Bihar Assembly Election 2020: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे.
Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा
ठळक मुद्देबिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईलभाजपा आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल