शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये १९ पैकी ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 05:23 IST

Bihar Politics:काँग्रेस नेत्याचाच दावा; राज्यात निर्माण झाली खळबळ  

पाटणा : बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या १९ आमदारांपैकी ११ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे. 

ते म्हणाले की, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ पाहणारे आमदार हे मुळात याआधी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसमध्ये आले होते. या लोकांनी भरपूर पैसे देऊन विधानसभा निवडणुकांत उमेदवारीची तिकिटे विकत घेतली व ते आमदार झाले. बिहारमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेशप्रसाद सिंह, काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हेदेखील पक्षत्याग करू शकतात. या नेत्यांनी नेहमीच पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, असा आरोप भरतसिंह यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले. (वृत्तसंस्था) 

काँग्रेस पक्ष कोमात : जनता दल (यू) जनता दल (यू)चे नेते राजीव रंजन यांनी सांगितले की, भरतसिंह यांची वक्तव्ये पाहता काँग्रेस पक्ष कोमामध्ये गेला असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसची गलितगात्र अवस्था लक्षात आल्यानेच त्या पक्षाचे नेते शक्तिसिंह यांनी स्वत:ला पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करून घेतले. काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला वाचविले पाहिजे; पण ते काम वाटते तितके सोपे नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहार