शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राम मंदिराच्या देणगीवरून विधानसभेत मोठा गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:33 IST

कामकाज काही वेळ स्थगित; नाना पटोले-फडणवीस आमनेसामने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यावरून विधानसभेत बराच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकामंध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याने अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे स्थगित करावे लागले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराच्या देणगीचा विषय उपस्थित करत भाजपवर शरसंधान साधले. राम मंदिराच्या उभारणीसाठी तुम्हाला कोणी पैसे गोळा करायला सांगितले? पैसे गोळा करण्याचा ठेका तुम्हाला रामाने दिला? आहे का, असा सवाल पटोले यांनी करताच भाजप सदस्यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला. मात्र पटोले यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले म्हणणे रेटले. पटोले म्हणाले, माझ्याकडे मनोहर कुलकर्णी नावाचे गृहस्थ आले होते. श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी देण्यास नकार दिल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरासाठी विना परवानगी असा निधी गोळा करण्याचा ठेका या लोकांना कोणी दिला? धर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेतली होती का? असे सवालही पटोले यांनी केले.? त्यावरुन भाजप सदस्य आक्रमक झाले. सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. आज हा विषय नसताना त्यावर चर्चा करणे योग्य नाही. हिंमत असेल तर राममंदिरावर स्वतंत्र चर्चा लावा, असो आव्हान त्यांनी सत्तापक्षाला दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले. 

त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावण्यात आले. तेथे एक बैठक झाली. त्या काळात भाजपचे सदस्य सभागृहात घोषणा देतच होते. नंतर मात्र सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.

देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल होणारnविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट आणि एका पोर्टलची बातमी व्हायरल झाली आहे. त्यावरून विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेस आमदार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोस्टचा उल्लेख विधानसभेत केल्याने भाजपचे आमदार संतापले. देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. nफडणवीस यांनी नाना पटोले यांचे आभार व्यक्त करत, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. माझ्याविषयी पोस्ट लिहिणारा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यावर तुम्ही कारवाई करणार का?, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला होता. त्यावर गुन्हा दाखल करून आजच अटकेची कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेvidhan sabhaविधानसभा