कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाची सुरुवात सुजय विखे-पाटील यांच्यापासून झाली आहे. आणखी एक भूकंप उत्तर महाराष्ट्रात होणार असून राज्यातील मोठी राजकीय घराणी भाजपात येणार असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केला.कोल्हापुरात २४ मार्चला गांधी मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे जागा महत्त्वाची असून, उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन केले.
मोठी घराणी भाजपाच्या संपर्कात - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:39 IST