शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 18:29 IST

Mumbai Politics News : 2022 च्या पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्षांचा कालावधी आहे. मात्र शिवसेनेत आतापासूनच इनकमिंग सुरू झाले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई  -  2022 च्या पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्षांचा कालावधी आहे. मात्र शिवसेनेत आतापासूनच इनकमिंग सुरू झाले आहे. गोरेगावात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कंबर कसली आहे. गोरेगावतील भाजपाचा मोठा नेता समीर देसाई यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे अशी जोरदार चर्चा गोरेगावात आहे. समीर देसाई हे माजी नगरसेवक असून मुंबईभाजपाचे सचिव आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीत आज दुपारी 12 वाजता हातात शिवबंधन बांधून समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई,शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू,महिला विभाग संघटक व जेष्ठ नगरसेविका साधना माने,भूषण सुभाष देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.6 वर्षांपूर्वी दि,22 नोव्हेंबर 2014 रोजी काँग्रेसला सोडचिट्ठी देत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.मात्र गेले काही दिवस ते भाजपावर नाराज होते.2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते.त्यांच्या पत्नी राजुल देसाई या भाजपाच्या प्रभाग क्रमांक 56 च्या विद्यमान नगरसेविका असून त्यांनी पी दक्षिण वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्षपद देखिल भूषवले होते. समीर देसाई यांच्या प्रवेशाने गोरेगावात शिवसेनेला मजबूती येईल अशी चर्चा आहे.कोण आहेत समीर देसाईसमीर देसाई हे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार गुरुदास कामत कामत यांचे भाचे आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा त्यांनी महापालिकेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. गोरेगावमधून त्यांनी काँग्रेसचे नगरसेवकपद भूषवले होते. मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपद त्यांनी भूषवले होते तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ते दहा वर्षे सदस्य देखिल होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाBJPभाजपा