शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद जाहीर; भाई जगताप यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:15 IST

Mumbai Congress President : काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभेनंतर संजय निरुपम यांना पायउतार व्हावे लागल्याने रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आमदार भाई जगताप यांची वर्णी लागली आहे.

काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंग आर मनहास यांना नियुक्त करण्यात आले आहे. अजेंडा आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांमध्ये चुरस होती.

मुंबईच्या या समितीमध्ये प्रिया दत्त, अमीन पटेल, जेनेट डिसुझा,  उपेंदर दोशी आणि महाराष्ट्र सरकारमधील मुंबईतील मंत्री व मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदींचा समावेश आहे. 

मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर दि,2 व दि,3 डिसेंबर रोजी मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्धल  मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. त्यापूर्वी गेल्या ऑक्टोंबर तसेच दिवाळी नंतर दुसऱ्या दिवशी दि,17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार,माजी खासदार,माजी मंत्री,विद्यमान आमदार,विद्यमान मंत्री,विविध सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. ओपिनियन पोल द्वारे त्यांनी 227 ब्लॉक अध्यक्ष व विभागीय पदाधिकारी अश्या  एकूण 550 जणांची त्यांनी मोबाईलवर चर्चा करून त्यांची मते देखिल अजमावली होती. या सर्व मान्यवरांनी डॉ. मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेस