शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचे पार्सल बारामतीला परत पाठवा- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:57 IST

देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे आवाहन

पनवेल : देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाखिचडी आघाडीला धडा शिकवा. या निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला आहे. बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये सभेचे आयोजन केले होते, या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेतली जात होती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत आहे. विरोधकांची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवार यांनी माढाच्या पिचवरून पळ काढला. कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले....तर रॉकेटसोबत नेता पाठविला असतापाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक जगातील सर्वांनी मान्य केला. फक्त पाकिस्तान व महाखिचडी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मान्य नाही. हल्ल्याचे पुरावे मागत आहेत. मी गमतीने त्यांना म्हणालो की, तुम्ही पुरावे मागणार हे माहीत असते तर रॉकेट सोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठविला असता व प्रत्यक्ष बघा म्हटले असते, असे मतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार