शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण, म्हणाले

By बाळकृष्ण परब | Updated: January 5, 2021 11:52 IST

Balasaheb Thorat News : सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे केले खंडन मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सरकारमध्ये मंत्री, पक्षाचे विधिमंडळ नेते आणि प्रदेशाध्यक्ष अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त काल आले होते. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही चर्चा फेटाळून लावली आहे. तसेच ही बातमी कुठून आली हे माहित नाही. या बातमीचा स्रोत शोधावा लागेल, असेही ते म्हणाले.दरम्यान, पक्षाला आपल्यावर अधिक जबाबदारी असल्याचे वाटून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरील जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास पक्ष जो निर्णय घेईल आणि जी जबाबदारी माझ्यावर दिली जाईल, ती स्वीकारण्यास मी तयार असेन, असे थोरात यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, असेही थोरात म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद, विधिमंडळ  नेते आणि प्रदेशाध्यक्ष अशी तिहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त काल आले होते. त्यासाठी थोरात यांच्या दिल्लीवारी केल्याचेही सांगण्यात येत होते.सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांनी त्याचा इन्कार केला आहे.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण