शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या नामांतरास आठवले यांचाही विरोध; वादावर अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 06:32 IST

Aurangabad Rename Politics : खासदार संभाजी राजे यांनी नामांतराचे समर्थन केले असून औरंगाबादचे संभाजीनगर होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराला काॅंग्रेस पक्षानंतर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही तीव्र विरोध केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचे वाद राज्य सरकारने बाजूला ठेवायला हवे. आधीच जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना विकासाचे, विधायक मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांनी नामांतराचे मुद्दे रेटू नयेत, असे आठवले यांनी सांगितले.

औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहिले पाहिजे, त्याचे नामांतर करता कामा नये. या सरकारने औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारा व्हिडीओ आठवले यांनी रविवारी जारी केला.नामांतरास विरोध का, यावर आपली भूमिका आठवले यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा वेळी नामांतरणासारखे मुद्दे आणू नयेत. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र, संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये. आम्ही १७ वर्षे नामांतराच्या आंदोलनाची धग भोगली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नामांतराच्या विषयावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचे औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.खासदार संभाजी राजे यांनी नामांतराचे समर्थन केले असून औरंगाबादचे संभाजीनगर होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू.    - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAjit Pawarअजित पवारAurangabadऔरंगाबाद