शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, मुंबईच्या संस्थाकडून विधानसभानिहाय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:30 IST

निवडणूक : विद्यमान आमदारांसह इतर पर्यायांवर शोध

जळगाव : विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेने दिल्ली, मुंबई येथील बड्या संस्थाकडून सर्वेक्षण सुरु केले आहे. यात आमदारांसह इच्छुक उमेदवार व नव्या पर्यायी उमेदवारांबाबत नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहे. येत्या पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून पक्षश्रेष्ठींकडे याबाबतचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आता राजकीय पक्षांनी देखील प्रत्येक निवडणुकीआधी नागरिकांचे मत जाणून घेवून निवडणुकीत योग्य उमेदवार कोण चांगला राहिल याबाबतचे सर्वेक्षण करून उमेदवार देण्यावर भर दिसून येत आहे. यासाठीच निवडणुकीच्या काही महिने अगोदरच मतदारसंघामध्ये सर्व्हे करून योग्य उमेदवाराच्या नावाबाबत माहिती जमा केली जात आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर या विधानसभांमध्ये भाजपाभाजपाकडून वर्षभरात तीन वेळा सर्वेक्षणजसा काळ बदलत आहे, त्यानुसार राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तंत्रासह निवडणुकीआधीच नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. यामध्ये भाजपाने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतलेली दिसून येत आहे. भाजपाने गेल्या वर्षभरापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून वर्षभरात भाजपाचे जिल्ह्यातील ११ विधानसभांमध्ये तीन वेळा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. २०१८ मध्ये जून-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तर यावर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे सर्वेक्षण व विधानसभा निवडणुकीचे सर्वेक्षण हे वेगवेगळ्या पातळीवरच करण्यात आले आहे.अशी आहे प्रश्नावलीशिवसेनेच्या सर्वेक्षणात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने युती करावी की नाही ?, युती केली तर फायदा कोणाचा ?, पाच वर्षात सत्तेत राहून शिवसेनेने जनतेसाठी भाजपा विरोधात घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य ?, स्थानिक आमदारांचे काम कसे ? याबाबतची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातून सुुरु केलेल्या जनआशिर्वाद दौऱ्याचा आधी व त्यानंतर अशा दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात आला.ळगाव, चाळीसगाव, अमळनेरवर लक्षभाजपाच्या सर्वेक्षणात प्रामुख्याने जळगाव शहर, चाळीसगाव, अमळनेर या तीन्ही विधानसभांच्या जागांवर अधिक भर दिला जात आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे आता खासदार झाले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेबाबत योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. तर अमळनेरला देखील अनेकजण भाजपाकडून इच्छुक असल्याने नागरिकांचे मत तपासले जात आहे. जळगाव शहराची जागेसाठी शिवसेनाही आग्रही असून, विद्यमान आमदार भाजपाचा आहे. अशा परिस्थितीत या जागेबाबतचा आढावा घेवून अंतिम अहवाल १० आॅगस्टपर्यंत पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक