शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप

By बाळकृष्ण परब | Published: January 25, 2021 5:24 PM

Balakot Air strike News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना मिळाली अशी माहिती देऊन आमच्या हवाई दलाच्या जवानांचे प्राण संकटात टाकले गेलेराहुल गांधींनी मोदींवर केला गंभीर आरोप

करूर (तामिळनाडू) - व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिक झाल्याने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. बालाकोट हल्ल्यासारखी माहिती त्यांना आधीच मिळाली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गंभीर आरोप केला ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ती व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळाली आहे. मात्र राहुल गांधी यांनी या संदर्भात कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाकडूनही या दाव्याबाबत काही उत्तर आलेले नाही.काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी आज करूर येथे रोड शो केला. तेव्हा तेम्हणाले की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह केवळ पाच जणांनाच कुठल्याही सैनिकी कारवाईची माहिती असते. मात्र काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला बालाकोट एअर स्ट्राइकबाबत आधीच माहिती मिळाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाकडून बॉम्बवर्षाव करण्याच्या तीन दिवस आधीच एका पत्रकाराला काय होणार हे सांगितले गेले. असे करून आमच्या हवाई दलाच्या जवानांचे प्राण संकटात टाकले गेले, असा आरोप राहुल गांधींनी केला.राहुल गांधी म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या लोकांशिवाय अन्य कुणालाही एअर स्ट्राइकच्या आधी याची माहिती नव्हती. आता बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी ही माहिती एका पत्रकाराला कुणी दिली. माहिती असलेल्यांपैकीच कुणीतरी हवाईदलासोबत विश्वासघात केला असावा, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक