शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज ठाकरेंची माफी मागा! मनसेच्या खळखट्याकनंतरअ‍ॅमेझॉनची सपशेल माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 22:30 IST

Amazon MNS Marathi News: अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

मुंबई : : मराठी भाषेचा पर्याय अ‍ॅमेझॉनवर असलाच पाहिजे अशी प्रमुख मागणी मनसेने केली होती. यावरून राज ठाकरेंना नोटीस गेल्याने आज उमटलेल्या खळखट्याकवरून अ‍ॅमेझॉनने सपशेल माघार घेतली आहे. 

मुंबईत विविध ठिकाणी ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स झळकवले होते. तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय जर उपलब्ध झाला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ कडक इशारा देखील मनसेकडून दिला गेला होता. मात्र याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाची नोटीस आली. यानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्यातील अॅमेझॉनची कार्यालयेच फोडल्याने अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. 

मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सात दिवसांची कालावधी द्यावा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा अ‍ॅमेझॉनने वापरली होती. तसेच राजसाहेब ठाकरे ह्यांच्यावर खटला भरण्याची धमकी देण्य़ात आली होती. आता मनसेने अ‍ॅमेझॉनला राज ठाकरेंची माफी मागण्याची मागमी केली आहे. मनसेने मुंबई, पुणे, वसई अशी तीन कार्यालये फोडली आहेत. 

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते मात्र.राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर अ‍ॅमेझॉनला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा चित्रे यांनी दिला होता.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. त्यांनी तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते.

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यामुळे मनसे आक्रमकमनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या पर्याय वापरण्यासंदर्भात सुरु करण्यात आलेल्या जोरदार मोहिमेला विरोध करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने न्यायालयात गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस धाडली. यात राज ठाकरे यांच्यासह ठराविक मनसे सचिवांना ५ जानेवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र मनसेकडून या नोटिशीचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेamazonअ‍ॅमेझॉनmarathiमराठी