नवी दिल्ली - एकीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणातहीभाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी ही घोषणा केली आहे.गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग आज अचानकपणे कोलकात्यामध्ये प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी एनडीए सोडत असल्याची घोषणा केली. तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ
By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 21:15 IST
BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे.
भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ
ठळक मुद्देगोरखा जनमुक्ती मोर्चाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी केली ही घोषणा २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी