शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य उच्च न्यायालयात; चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 03:07 IST

माजी मुंबई पोलीस आयुक्त व विद्यमान गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी यामध्ये निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी याचिका वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकताच भ्रष्टाचाराचा आरोप केला. या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करावी, यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे

माजी मुंबई पोलीस आयुक्त व विद्यमान गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी यामध्ये निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी याचिका वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्याशिवाय पुणेस्थित हेमंत पाटील यांनीही अशाच स्वरूपाची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, या दोन्ही याचिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.अनिल देशमुख हे गृहमंत्र्याचे पद संभाळण्याकरिता विश्वासार्ह नसल्याचे उघडकीस आले आहे. ते आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना सामान्य माणसांना आणि व्यावसायिकांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश देत, असे जयश्री पाटील यांनी याचिकेत नमूद केले.माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवले आहे. देशमुख हे वारंवार पोलीस तपासात हस्तक्षेप करत. पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार बोलावून त्यांना तपास कसा करायचा, याबाबत सूचना देत असत, असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबईतील १,७५० बार, रेस्टॉरंटकडून महिना ४० ते ५० लाख रुपये मिळविण्याचे व उर्वरित रक्कम अन्य स्रोतांकडून मिळविण्यास सांगितले हाेते. देशमुख यांच्याविरोधात सिंह यांनी गुन्हा नोंदविला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फौजदारी दंडसंहिता कलम १५४अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा अधिकार आहे. मात्र, सिंह यांनी याप्रकरणात काही कारवाई का केली नाही, याचाही तपास करायला हवे, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

तपास जलद सुरू करावा, अन्यथा पुरवाे नष्ट हाेतील !ज्या ठिकाणी हा कट रचला गेला, तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना द्यावेत. अन्यथा ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मलबार हिल पोलीस ठाण्यात याबाबत पोलीस तक्रार केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. त्यामुळे पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही पाटील यांनी केली. साेबतच तपास जलदगतीने सुरू करण्यात आला नाही तर पुरावे नष्ट करण्याची भीतीही पाटील यांनी व्यक्त केली, तर अशीच मागणी करणारी याचिका पुण्याचे हेमंत पाटील यांनीही उच्च न्यायालयात केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नेमून या तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, तसेच अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम १६६ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुख