शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीबाबत अजित पवार बोलले, राजकीय तर्कवितर्कांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 16:38 IST

AJit Pawar News : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली विचारणा...

बारामती -  नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की,विकास कामासंदर्भात आमदार खासदारांचे एकमेकांना भेटणे होत असते .मी विरोधी पक्षात असताना विकास कामाबाबत त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडे माझी कामे घेऊन जात होतो. तशीच सातारा मतदारसंघाच्या विकास कामासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यांची जी कामे आहेत. त्या कामासंदर्भात मंत्रिमंडळात बैठक लावतो. असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.युतीचे सरकार असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी नुकताच केला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, यासंदर्भातील वृत्त मी माध्यमावर पाहिले आहे. याबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाची ऑफर कोणी व कशासाठी दिली होती याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय अधिक बोलणे उचित ठरणार नाही अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

नागरिकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग व पोलीस खात्यातीलभरती करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात मी मागेच संबंधितांशी बोललो आहे. भरती करत असताना मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात निर्णय प्रक्रिया चालू आहे. जानेवारीत याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र ती तारीख फेब्रुवारी मध्ये निर्णय गेला आहे. मात्र राज्यात वेगवेगळी नोकरभरती होत असताना कोणताही समाज घटक वंचित राहणार नाही याबाबत महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेPoliticsराजकारण