शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या हाती अहमदनगरची चावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:28 IST

लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो.

- सुदाम देशमुखलोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो. यावेळी मात्र, भाजपची वाटही बिकट दिसते. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्टÑवादीचे तुकाराम गडाख यांना इथे एकदा संधी मिळाली तर दिलीप गांधींच्या रुपाने सध्या भाजपाचा खासदार आहे. २००४ चा अपवाद वगळता ते सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत.शिवसेना-भाजपामागे राज्यात ओबीसींची मोठी व्होट बँक आहे. नगरमध्येही भाजपाला याचाच फायदा झाला. १९९८ पर्यंत इथे सेना-भाजपाला शिरकाव करता आला नव्हता. १९९८-९९ मध्ये बाळासाहेब विखे सेनेच्या तिकिटावर खासदार झाले तर १९९९ मध्ये भाजपाचे दिलीप गांधी निवडून आले. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दादा पाटील शेळके व काँग्रेसचे बाबासाहेब भोस यांच्यातील मतविभागणीने गांधी संसदेत पोहचले. २००४ मध्ये भाजपा व राष्टÑवादी यांच्यात झालेल्या सरळ लढतीत भाजपाचे ना. स. फरांदे पराभूत होऊन तुकाराम गडाख विजयी झाले. २००९ साली राष्टÑवादीत बंडखोरी होऊन शिवाजी कर्डिले व राजीव राजळे हे आमनेसामने आले. त्यांच्यातील मतविभागणीचा पुन्हा गांधी यांना फायदा झाला. दोन्ही काँग्रेसमध्ये जेव्हा बिघाडी अथवा बंडखोरी झाली तेव्हा भाजपाला फायदा झाला आहे.२०१४ मध्ये मोदी लाट भाजपाच्या मदतीला आली. आता गांधी पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपाचेच अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. नगर महापालिकेत गांधींना अपयश येऊनही त्यांनी राष्ट्रवादीच्या बळावर भाजपाचा महापौर केला. लोकसभेत याचा त्यांना फायदा होणार की तोटा हे निवडणुकीत दिसून येईल. गांधींना उमेदवारी नाकारल्यास पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, प्रा. भानुदास बेरड यांचीही चर्चा आहे. राष्टÑवादीचे नाव अद्यापही ठरलेले नाही. राष्ट्रवादीने आमदार अरुण जगताप यांच्या विचार सुरु केला होता पण त्यांचे पुत्र आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेत भाजपाला पाठिंबा दिल्याने जगताप यांचे नाव चर्चेतून बाद झाले आहे. नरेंद्र घुले, दादा कळमकर, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे नाव आहे. पवारांनीही त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते.राष्ट्रवादीसमोर नेहमी बंडखोरीची डोकेदुखी राहिली आहे. याहीवेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे स्वत: इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी त्यांची मागणी आहे. मतदारसंघ कॉंग्रेसला न सोडल्यास राष्टÑवादीसह कुठल्याही पक्षाच्या तिकीटावर किंवा अपक्ष लढू, अशी सुजय यांनी घोषणा केली आहे. एकतर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणे किंवा विखेंशी लढण्याची तयारी ठेवणे हे दोन पर्याय राष्टÑवादीसमोर आहेत.>सध्याची परिस्थितीयुती झाली तर हा मतदारसंघ भाजपाकडे राहील. मात्र, शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी केली असून; घनश्याम शेलार हे शिवसेनेचे उमेदवार असतील. तसे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले आहे. इच्छुकांमध्ये नव्या नावांची भर पडते आहे.भाजपचा सहयोगी असलेल्या रासपनेही या जागेवर दावा केला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीही इथे उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला न सुटल्यास विखे हे कोणाची उमेदवारी घेणार? यावरही मतदारसंघातील राजकारण ढवळून निघणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीला इथे विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. ही जागा काँग्रेसला मिळाल्यास सुजय विखे हे उमेदवार असतील. त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? विखे यांना राष्ट्रवादीची किती मदत मिळणार आणि त्याचा फायदा कोणाला ? याची गणिते सध्या इथे मांडली जात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९