शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

'सर्जन'ला पर्याय 'कुलगुरूं'चा ? : राष्ट्रवादीत अहमदनगरच्या उमेदवाराचा खल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 13:44 IST

भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे न्युरोसर्जन असल्याने त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीकडून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना मैदानात उतरविले जाईल, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

अहमदनगर : भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे हे न्युरोसर्जन असल्याने त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीकडून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांना मैदानात उतरविले जाईल, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्या दोन याद्यांमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेला नाही. हा विलंब का केला जात आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप किंवा त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांचे नाव जाहीर केले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, तो निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.अरुण जगताप यांचे संघटन व नातेसंबंध मोठा आहे. मात्र, केडगाव हत्याकांडानंतर झालेले राजकारण त्यांच्या प्रचाराच्या आड येईल की काय ही शंका आहे. तरुण चेहरा म्हणून संग्राम जगताप यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र ते स्वत: इच्छुक नसल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीनंतर शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरमध्ये भाजपसोबत युती केली होती. प्रचारात हा मुद्दा भाजपाकडून उपस्थित केला जाऊ शकतो.उच्चशिक्षित उमेदवार म्हणून माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे हा एक पर्याय राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी नांदेड व लखनौ या दोन विद्यापीठांचे कुलगुरुपद भूषविले. नगर शहरात ते दीर्घकाळ प्राचार्य होते. मागासवर्ग आयोगावर सदस्यही आहेत. निमसे हे मूळचे नगर तालुक्यातील असून त्यांना उमेदवारी दिल्यास राजकारणबाह्य सामान्य चेहरा दिला, असा प्रचार राष्ट्रवादी करू शकेल. सर्जन व शिक्षणसम्राट विरुद्ध कुलगुरु अशी लढत राष्ट्रवादीला उभी करता येईल, असाही एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९