शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोण उधळणार विजयाचा भंडारा : सुप्रिया सुळेंपाठोपाठ कांचन कुल यांचेही जय मल्हार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:09 IST

बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह दर्शन घेतले.

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध 'पाचपावली'ची प्रथा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांपूर्वी आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनीही पती सदानंद सुळे यांच्यासोबत खंडोबा दर्शन केल्याने खंडोबा कोणाला पावणार या चर्चेला ऊत आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कुल परिवाराकडून कांचन कुल यांच्या विजयाचे साकडे खंडोबाला घालण्यात आले. बारामती खंडोबा गडाच्या पायऱ्या चढताना कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांना 5 पायऱ्या घेवुन गड चढावा असा हट्ट धरला.अखेर कार्यकर्त्यांचा हट्ट पुर्ण करत त्यांनी पत्नीला उचलले. असाच आग्रह काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दर्शनासाठी आलेल्या सदानंद सुळे यांना झाला होता. त्यावेळी त्यांनीही सुप्रिया सुळे यांना उचलण्याचा प्रयत्न केला होता. 

जेजुरी आणि अष्टविनायकातील मोरगाव अशी दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या मतदारसंघात येतात. प्रचाराच्या काळात उमेदवारांचे सर्व देवदेवतांचे दर्शन सुरु असतेच. मात्र सुळे यांचाच कित्ता कुल यांनी गिरवल्यामुळे मतांचे दान कोणाच्या पदरात पडणार आणि विजयाचा भंडारा कोण उधळणार याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbarabanki-pcबाराबंकीSupriya Suleसुप्रिया सुळे