शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनंतर कुडाळात भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, आमदार वैभव नाईकांचा काढता पाय; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 14:03 IST

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची सवंग घोषणाबाजी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांची आज कुडाळात पळता भुई झाली.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची सवंग घोषणाबाजी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांची आज कुडाळात पळता भुई झाली. पेट्रोल वाटपासाठी कुडाळ शहरातील पेट्रोलपंपाची जाहीरात करणाऱ्या शिवसेनेने काढते पाऊल घेत जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मोर्चा वळवला.

शिवसेना आमदारानं मोफत पेट्रोलसाठी दिला नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, पण घडलं उलटंच!यावेळी आमदार नाईक यांनी पोलिसांनाही धक्काबुक्की करत पोलीस अधिकाऱ्याला धक्का देत ढकलुन दिले. पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर वातावरण जोरदार तापले. यानंतर आमदार वैभव नाईक यांनी ताबडतोब काढता पाय घेतला. आजही वैभव नाईक यांना आंदोलन करण्यासाठीदेखील नारायणराव राणें यांचाच पेट्रोलपंप दिसतो, हा शिवसेनेच्या ५५ वर्षाच्या कारकिर्दीचा आणि वैभव नाईक यांच्या कामाचा दारुण पराभव आहे, असे मत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना भर रस्त्यावर वर्दी पकडत धक्काबुक्की करण्याऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण काही काळ तंग झाले होते.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशनPetrolपेट्रोलNarayan Raneनारायण राणे