शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर जोशींनंतर नितीन गडकरींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

By बाळकृष्ण परब | Updated: January 7, 2021 18:26 IST

Nitin Gadkari News : शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देसकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीगेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विजयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेतअशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवसात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेते ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

मुंबई - महाराष्ट्र भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिवसभरात शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विजयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात कठोर टीका होत आहे. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवसात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेते ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळी गडकरी यांनी मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विकासामध्ये नितीन गडकरी यांचा महत्वाचा वाटा होता.  गडकरींनी घेतलेल्या आशीर्वादांची आज सकाळपासूनच चर्चा सुरू होती. .या भेटीच्या चर्चेदरम्यान संध्याकाळी गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणती चर्चा झाली. याचा तपशील मात्र समोर येऊ शकलेला नाही. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण