शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्वाभिमानी संघटना आज सत्तेतून बाहेर..भाजपची डोकेदुखी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:53 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. आज, बुधवारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सरकारला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करणार आहेत. ...

ठळक मुद्दे कार्यकारिणीची पुण्यात बैठक : ; शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची रणनीतीसंख्याबळाच्या पातळीवर सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आम्ही सत्तेसाठी लाचार नसल्याचा संदेश काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात स्वाभिमानी संघटनेचाही वाटा अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. आज, बुधवारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सरकारला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करणार आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. तूर्त कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडायची रणनीती संघटनेने आखली आहे.राज्यातील दोन्ही काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात स्वाभिमानी संघटनेचाही वाटा होता. लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीच्या पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची महाआघाडी झाली. पुढे विधानसभेला भाजप व शिवसेनेच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी ‘स्वाभिमानी’ भाजपसोबत राहिली. त्याची भरपाई म्हणून संघटनेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्रिपद देण्यात आले. ते सत्तेत गेले आणि संघटनेतील दुही सुरू झाली. खोत संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सत्तेत गेले; परंतु तिथे गेल्यावर ते सरकारचेच हस्तक बनल्याने शेट्टी व खोत यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यातून संघटनेने गेल्या महिन्यांत सदाभाऊंची हकालपट्टी केली; परंतु सत्तारूढ भाजपने मात्र त्यांना अभय देत सत्तेत कायम ठेवले. उलट महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर सदाभाऊ हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाल्याचे सांगून टाकले. त्यामुळे संघटना सत्तेतून बाहेर पडणार हे स्पष्टच होते. ती बाहेर पडते की पडणार, पडणार म्हणत सत्तेला चिकटून राहते, हीच उत्सुकता होती.दोन मतप्रवाहसत्तेतून बाहेर पडण्याबाबतही संघटनेत दोन मतप्रवाहहोते. आपण सत्तेतून बाहेर पडलो तर भाजपवाले आपल्याला अजिबातच जुमानणार नाहीत. शिवाय शेट्टी यांच्या विरोधात लोकसभेला उमेदवार तयार करण्यात त्यांना पुरेसा अवधी मिळेल. त्याऐवजी तोंडावर निवडणुका असतानाच आपण सत्तेला लाथ मारावी. आता सत्तेत राहूनच सदाभाऊ यांनाही चाप लावण्यात सोपे होईल, असे एका गटाचे म्हणणे होते.

आपण शेतकºयांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी सरकारला पाठिंबा दिला. तेच काम जर सरकार करणार नसेल तर सत्तेत राहायचे कशासाठी, असे एका गटाचे म्हणणे होते. शेट्टी व संघटनेला सत्ता सोडवत नाही, अशी टीका होण्याऐवजी सत्तेवर लाथ मारून स्वाभिमानाने बाहेर पडावे व शेतकºयांच्या प्रश्र्नांवर आक्रमकपणे काम करावे. त्यात लोकसभेचे काय होईल त्याचा विचार आता करण्याचे कारण नाही. लोक आपल्यासोबत आहेत असा विचार दुसºया गटाचा होता. मुख्यत: स्वत: शेट्टीदेखील याच विचाराचे असल्याने हा निर्णय झाला.लाचार नाही..राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये ‘स्वाभिमानी’ने मागितल्यास मंत्रिपद देऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते; परंतु ती शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडली असे चित्र जाऊ नये यासाठी घाईने हा निर्णय घेण्यात आला असून, आम्ही सत्तेसाठी लाचार नसल्याचा संदेश त्यातून देण्याचा ‘स्वाभिमानी’चा प्रयत्न आहे.तूपकर राजीनामा देणारआता स्वाभिमानी शेतकरी संघटना तशी तांत्रिकच सत्तेत होती. संघटनेचे नेते रविकांत तूपकर हे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आहेत; परंतु त्यास निधीच दिलेला नाही. त्यामुळे ते आजच आपला राजीनामा संघटनेकडे सादर करण्याची शक्यता आहे. शेट्टी वगळता संघटनेचे लोकसभा व विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे संख्याबळाच्या पातळीवर सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.सोडचिठ्ठी देणारा पहिला पक्ष : भाजपची राज्यात सत्ता यावी यासाठी झटलेली स्वाभिमानी संघटना अवघ्या तीन वर्षांतच सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी बसविण्याची भाषा करण्याची हिंमत अजून काँग्रेसलाही आलेली नाही आणि खासदार शेट्टी मात्र पंतप्रधानांवर तशी थेट टीका करू लागले आहेत. लोकसभेच्या प्रचारात कोल्हापुरातील सभेत मोदी यांनी शेट्टी यांचा उल्लेख ‘माझा परममित्र’ असा केला होता. ही मैत्री अल्पजिवी ठरली आहे.