शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

By यदू जोशी | Updated: March 12, 2019 08:02 IST

आदित्य मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

- यदु जोशीमुंबई : युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार गांभीर्याने सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. शिवसेनेने आदित्य यांच्यासाठी मुंबई उत्तर-मध्यची जागा मागितली तर त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लढावे, असे भाजपाकडून सुचविले जाऊ शकते. उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव  ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवरते मत कधीही लादलेले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. आदित्य यांनी आजवर कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नसली तरी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत.शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. दुसरीकडे, मावळमधील जागा शिवसेनेकडे असून तेथे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. राष्ट्रवादीने तेथे पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर केल्याने ही जागा युतीमध्ये आम्हाला द्या, असा आग्रह भाजपाकडून होऊ शकतो. या शिवाय साताराची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपाला हवी आहे. पालघरची भाजपाकडील जागा शिवसेनेला दिली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे