शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Aasam Assembly Elections: "रिकामी तिजोरी भरण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही पद्धतीने हवी आहे सत्ता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 06:58 IST

पंतप्रधान मोदी यांची टीका : राज्यातील विकासाचा वाचला पाढा 

बोकाघाट (आसाम) : देशात आणि राज्यात विविध भागांत प्रभाव कमी होत असलेल्या काँग्रेसची तिजोरी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे ती भरण्यासाठी ते कोणत्याही प्रकारे सत्तेत येऊ इच्छितात. यासाठी ते कोणाशीही तडजोड करू शकतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विरोधकांवर हल्लाबोल केला. 

रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती तेव्हा आसामकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी राज्यातील लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. आज केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने आसाम विकासाच्या मार्गावर आहे. महामार्गांचे काम दुप्पट वेगाने सुरू आहे. कारण, राज्य सरकारही आसामला देशाशी जोडत आहे. आता प्रत्येकाला छत आणि प्रत्येक घरात पाणी असे कामे वेगाने होत आहेत. ते म्हणाले की, या लोकांना खोटे आश्वासने देण्याची, खोटे जाहीरनामे बनविण्याची सवय झाली आहे. काँग्रेस म्हणजे खोट्या जाहीरनाम्याची हमी. काँग्रेस म्हणजे भ्रम, अस्थिरता, बॉम्ब, बंदूक आणि नाकेबंदी यांची हमी. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सांगणारा हा पक्ष आसाम, प. बंगाल आणि केरळमध्ये धार्मिक आधारावर बनलेल्या पक्षांसोबत मैत्री करत आहे. झारखंड, बिहार, महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत यांची आघाडी आहे ते प. बंगालमध्ये यांच्याविरुद्ध प्रचार करत आहेत. 

त्यांची मैत्री केवळ खुर्चीशी आहे

मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वात रालोआ सरकार सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास या धोरणानुसार पुढे जात आहे. मात्र, आजच्या काँग्रेस नेत्यांना केवळ सत्ता हवी आहे. मग ती कोणत्याही प्रकारे मिळाली तरी चालेल. खरे तर काँग्रेसची तिजोरी रिकामी झाली आहे. ती भरण्यासाठी त्यांना कशीही सत्ता हवी आहे. काँग्रेसची मैत्री केवळ खुर्चीशी आहे. त्यांच्याकडे ना नेतृत्व आहे ना दृष्टी. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या पाच आश्वासनांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५० वर्षांपर्यंत आसाममध्ये राज्य करणारे लोक आजकाल राज्याच्या जनतेला पाच आश्वासनांची हमी देत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी