शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’-काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न करीनच - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:45 IST

दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले.‘लोकमत’ ने विचारलेल्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी मी शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करीन.’ हरियाणात ‘आप’ ने जजपासोबत (जननायक जनता पार्टी) नुकतीच आघाडीची घोषणा केली होती. त्यानंतर असे मानले जात होते की, दिल्लीत ‘आप-काँग्रेस’ यांच्यातील आघाडीची शक्यता संपली आहे. मात्र केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी ‘आप-काँग्रेस’ आघाडीची शक्यता शिल्लक आहे.दिल्लीत ‘आप-काँग्रेस’ यांच्यातील आघाडीवरून काही दिवसांपूर्वी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनीकाँग्रेसशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेस एक अव्यावहारिक करार करू इच्छितो जो शक्य नव्हता, असे ते म्हणाले. पंजाबमध्ये ‘आप’ चे चार खासदार आणि २० आमदार आहेत तेथे काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. ज्या हरियाणात काँग्रेसचा फक्त एकच खासदार आहे तरीही काँग्रेस जागा द्यायला तयार नाही. गोव्यात ‘आप’ने ६ टक्क्यांपेक्षाही जास्त मते घेतली होती तेथेही काँग्रेस जागा द्यायला राजी नाही.

>काँग्रेसला हव्या तीन जागाकाँग्रेसला ‘आप’कडून तीन जागा हव्या आहेत. हे पूर्णपणे अव्यावहारिक आहे. यानंतर हरियाणात जजपासोबत ‘आप’ ने तीन जागांवर आघाडी केली त्यामुळे दिल्लीत काँग्रेससोबत आघाडीची शक्यता संपली असेच मानले जात होते. परंतु, रविवारी केजरीवाल यांनी शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करण्याचे वक्तव्य केल्यामुळे दिल्लीत आघाडीच्या शक्यतेला हवा मिळाली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019AAPआप