शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 20:46 IST

CM Uddhav Thackeray, AAP News: उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते.

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या  ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार, असे वचन दिले होते. त्याउलट आपत्तीच्याही परिस्थितीत वीजदर वाढवून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांच्यावर फसवणूक व अप्रामाणिकपणाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहर हद्दीतील सात विविध पोलीस ठाण्यांत नोंदविली. 

मुख्यमंत्र्यावर भारतीय दंड संहिता कलम ४१५ (फसवणूक) आणि ४२० (अप्रामाणिकपणा बेईमानी) तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) भ्रष्ट व्यवहाराप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपचे महानगर संयोजक संजय पांडव, जिल्हा सचिव रोशन अर्डक, सहसंयोजक प्रमोद कुचे, किशोर वानखडे, रंजना मामर्डे, प्रवीण काकड, वसंत पाटील, महेश देशमुख, अतुल वानखडे, सुरेश साहू, आशिष देशमुख, पंकज कुऱ्हेकर, संतोष रंगे यांनी   नोंदविली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. मात्र, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्या वचनाची प्रतही तक्रारकर्त्यांनी तक्रारीला जोडली होती.

चांदूर रेल्वेत मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रारशिवसेनेच्या वचननाम्यातील वीजेच्या मुद्यावर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करून ‘आप’च्यावतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार देतेवेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री  नितीन गवळी, गौतम जवंजाळ, विनोद लहाने, चरण जोल्हे, नीलेश कापसे, गोपाल मुरायते, हरिभाऊ जुनघरे, सागर गावंडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीजAAPआपShiv Senaशिवसेना