शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:08 IST

तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.

नवी दिल्ली : पूर्वी हम दो, हमारे दो असा नारा होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो‘चे सरकार आहे. ते कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो या उद्गारांवर केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आव्हान दिले की, राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांच्या संदर्भात हम दो, हमारे दो असा उल्लेख केला आहे. हे उद्योगपती व मोदी सरकारबद्दल केलेले आरोप सिद्ध होतील, असे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर करावेत.राहुल गांधी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांमधील पहिला कायदा हा देशातील मंडईव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांकडून उद्योजक किंवा कंपन्या अमर्याद स्वरूपात शेतीमाल खरेदी करून त्याची हवा तितका काळ साठवणूक करू शकतील, अशी मुभा दुसऱ्या कृषी कायद्याद्वारे मिळाली आहे. शेतकऱ्यांना हक्काच्या गोष्टी कॉपोर्रेट कंपन्यांकडून मागण्यास तिसऱ्या कृषी कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.शेतकऱ्यांपुढे तीन पर्याय भूक, बेकारी, आत्महत्याराहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांपुढे भूक, बेकारी, आत्महत्या हे तीनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी