शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेले अट्टल गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 00:11 IST

दरोड्याची तयारी : एक पिस्टल, जिवंत काडतूस, घातक शस्त्रे जप्त

हिंजवडी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूस रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस तसेच घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

रोहित लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. पडवळनगर, थेरगाव), अक्षय राजेंद्र फुगे (वय २०, रा. शिवराजनगर, जगताप डेअरी), आशिष कैलास कांबळे (वय २०, रा. पडवळनगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचे सहा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या सराईतांकडून एक पिस्टल, काडतूस, चार कोयते, मिरची पूड रोख रक्कम, दोन दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १३) रात्री पोलीस नाईक विवेक गायकवाड यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित तरुणांचे टोळके सूस रस्त्यावरील स्मशानभूमीच्या अलीकडच्या कोहिनूर सोसायटीसमोरील मोकळ्या मैदानात दुचाकींवर थांबले आहेत. माहिती मिळताच ताबडतोब वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी कोहिनूर सोसायटीकडे धाव घेतली. तेथे उभे असलेल्या संशयित तरुणांना हटकले असता पळून जाणाºया टोळक्यामधील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. इतर सहा जण पसार झाले आहेत.

ताब्यात घेतलेल्या रोहित गायकवाडवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. अक्षय फुगे व आशिष कांबळे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. फरार झालेल्या आरोपींची नावे समजली असून, ते देखील अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, उपनिरीक्षक अशोक गवारी, किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, विवेक गायकवाड, आतिक शेख, कुणाल शिंदे, विकी कदम, सुभाष गुरव, जनसिंग गुमलाडू,अमर राणे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड