शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे : संकल्प गोळे; नववर्षाचे पिंपरीत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:54 PM

तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले.

ठळक मुद्देवाल्हेकरवाडी ते कार्ला एकवीरा देवी पालखी सोहळा३०० लोकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत व्यसनापासून दूर राहण्याचा केला संकल्प

रावेत : सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाकडे वळली आहे. व्यसनामुळे स्वत:बरोबर कुटुंबाचे नुकसान होत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाला वेगळेपण देण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले.वाल्हेकरवाडी येथील एकवीरा सेवा संघ ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नववर्ष स्वागतासाठी आयोजित वाल्हेकरवाडी ते कार्ला एकवीरा देवी पालखी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी केले. या वेळी पालखीचे पूजन नगरसेविका करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, सुरेश भोईर, सचिन चिंचवडे, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, नीलेश मरळ, कोंडिबा शिवले, खंडू चिंचवडे, सोमनाथ भोंडवे, लाला वाल्हेकर, सोपान वाल्हेकर, मदन कोकणे, रमाकांत कोकणे, अ‍ॅड. अरुण भराडे, हेमंत ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी बाबा गाडगे, शिवाजी आवारे, विनोद राठीड, बिरुमल चोबे, विशाल मोहिते, गणेश गिरी, महेश ढाकोळ, राजू सोनार, संतोष सोरटे, उत्तरेश्वर शिंदे, संतोष पवार, हर्षवर्धन कुºहाडे, संतोष तिकोणे आदींनी परिश्रम घेतले. अध्यक्ष सुधीर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले.

तीनशे तरुणांचा पालखी सोहळ्यात सहभागवाल्हेकरवाडीतील एकवीरा सेवा संघाच्या वतीने सरत्या वर्षाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देण्याकरिता प्रत्येक वर्षी संस्थापक अध्यक्ष सुधीर ऊर्फ आबा वाल्हेकर आणि महिला प्रदेशाध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी वाल्हेकरवाडी ते कार्ला देवीपर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वर्षी या सोहळ्यात तरुणांचा सहभाग वाढत चालला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये आनंद लुटतात.काही जण गाण्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत चित्र-विचित्र अंगविक्षेप करताना नाचतात. काही जण घरातच टीव्हीवरील कार्यक्रम पाहून समाधान मानतात. काही जण सहलीला जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. या सर्वांना फाटा देऊन महिला, तरुण, लहान मुलगे, ज्येष्ठ नागरिक आदी जवळपास ३०० लोकांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड