कामशेत : येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आमन दिनेश गुप्ता (वय १९, रा. कामशेत) याचा मृत्यू झाला. कामशेत हद्दीतील जुन्या महामार्गावर एका हॉटेलसमोर पुणेकडून मुंबईकडे जाणारी भरधाव वेगातील मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजक तोडूनट्रकला धडकली. (वार्ताहर)
मोटार अपघातात तरुण ठार
By admin | Updated: November 15, 2016 03:17 IST