शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहितीये; हवेतूनच खेचला जातो ऑक्सिजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 05:55 IST

निष्णात तज्ज्ञांची आवश्यकता

विशाल शिर्केलोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आपल्याला वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले आहे. वातावरणातील हवा खेचून त्यातून ऑक्सिजन वेगळा काढून तो वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. रॉकेट सायन्ससारखीच अत्यंत गुंतागुंतीची जोखमीची प्रक्रिया त्यासाठी वापरली जाते. वातावरणात असलेल्या वायूंचे प्रमाणआपल्या वातावरणात धूलिकण, बाष्प यांसह विविध प्रकारचे वायू असतात. नायट्रोजन (७८ टक्के), ऑक्सिजन (२०.९४ टक्के), ऑरगॉन (०.९३ टक्के), कार्बनडाय ऑक्साईड हे वातावरणातील प्रमुख वायू असून, ते वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात. त्यानंतर निऑन, हेलियम, हायड्रोजन, मिथेन, ओझोन असे काही वायू वातावरणाच्या वरच्या थरात असतात. उंच ठिकाणी ऑक्सिजन विरळ असल्याने गिर्यारोहकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जावा लागतो.कसा बनवितात वैद्यकीय ऑक्सिजनगॅस ऑक्सिजन आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो. वैद्यकीय कारणासाठी द्रव स्वरूपात ऑक्सिजन साठविला जातो. यंत्राद्वारे वातावरणातील हवा खेचली जाते. त्यानंतर हवा तीनदा शुद्ध केली जाते. धूलिकण आणि इतर अशुद्ध भाग काढला जातो. कार्बनडाय ऑक्साईड वायू वातावरणात पुन्हा सोडला जातो. केवळ नायट्रोजन, ऑक्सिजन आणो ऑरगॉन हे तीन वायू साठविले जातात. उद्योगांमध्ये या तिन्ही वायूंची आवश्यकता असते. ऑक्सिजन द्रव स्वरूपात आणण्यासाठी उणे १८० डिग्री तापमान संतुलित घेवावे लागते. यासाठी उच्चदाब प्रक्रिया अवलंबली जाते. असा ऑक्सिजन इस्पितळात सिलिंडरद्वारे अथवा मोठ्या टँकद्वारे पुरविला जातो. गॅस सुरू केल्यानंतर द्रव ऑक्सिजन वायू स्वरूपात बाहेर येतो.

काय आहे आव्हानnएखाद्या प्रकल्पाची क्षमता शंभर टन असेल तर त्याची साठवणूक क्षमता तीनशे टन असते. तिन्ही वायूचा दाब नियंत्रित करावा लागतो. nहा दाब नियंत्रित करणे आवश्यक असते अन्यथा टाकी फुटून प्रकल्पालाही धोका पोचू शकतो. nकारखान्यातील टँकमधून गाडीत ऑक्सिजन भरणे आणि गाडीतून तो खाली करणे हे काम जिकिरीचे असते. त्यासाठी चालकही प्रशिक्षित असावा लागतो. प्रकल्प हाताळण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञ आवश्यक असतो.