शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कामगारांची मुले मैदानाविना

By admin | Updated: April 22, 2017 03:55 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीतील २८ एकर जागेवरील अण्णासाहेब मगर स्टेडियम हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १९९२ ला हस्तांतरीत करण्यात आला.

पिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीतील २८ एकर जागेवरील अण्णासाहेब मगर स्टेडियम हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १९९२ ला हस्तांतरीत करण्यात आला. या बदल्यात महापालिकेकडून पाच जागा मंडळाला देण्यात येणार होत्या. त्यापैकी चार जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत कामगार मंडळ आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यासाठी, तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदानही उपलब्ध नसल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. शहराची ओळख औद्योगीकनगरी व कामगारनगरी अशी आहे. त्यामुळे हजारो कामगार शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, कामगार मंडळांकडून राबविण्यात येणारे उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमासाठी मंडळाकडे जागाच उपलब्ध नाहीत. महापालिकेशी झालेल्या कराराप्रमाणे पाच जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बदल्यास एकच जागा चिंचवडमधील सर्व्हे क्रमांक १९५ येथे देण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणीही अतिक्रमण सुरू झाले आहे. या जागेवर महापालिकेने २००८ ला मंडळाच्या परवानगीविना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींसाठी शेड उभारले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा महापालिकेने जागेवर रस्ता रुंदीकरण केले. त्यामुळे कामगार मंडळाकडे हस्तांतरीत एका जागेचाही उपयोग झालेला नाही. (प्रतिनिधी)कामगार भवनाला नाही अग्निशामक यंत्रणा दरम्यान, महापालिकेकडून उर्वरित जागा मिळविण्याचे सोडून मंडळाने चिंचवड येथील संभाजीनगर येथे एमआयडीसीकडून जागा विकत घेऊन बहुउद्देशीय कामगार भवन उभारले. परंतु, हे बहुउद्देशीय कामगार भवन सुरूहोऊन चार वर्षे उलटूनही याठिकाणी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही. इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी, रोज सुविधांसाठी येणारे कामगार व त्यांचे कुटुंबीय, बालवाडीत येणारी बालके या सर्वांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या जागेच्या बदल्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला चिंचवड येथील उद्योगनगर येथे जागा दिली आहे. उर्वरित जागांचे भूसंपादन व हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. - मीनिनाथ दंडवते, सहायक आयुक्त, भूमी-जिंदगी विभाग