शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:56 IST

फलाटांची लांबी कमी असल्याने पिंपरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होत होती.

ठळक मुद्दे१७ डब्यांच्या गाडीसाठी सुविधा मोरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचाही रेल्वे प्रवाशांना वापर करता येणारपिंपरी स्टेशन येथे प्रवाशांसाठी स्वयंचलित जिना उभारणी

पिंपरी : फलाटांची लांबी कमी असल्याने पिंपरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होत होती. १७ डब्यांची गाडी थांबल्यास त्यासाठी फलाट कमी पडत होते. त्यामुळे प्रवाशांना गाडीत ये-जा करताना कसरत करावी लागत होती. ही कसरत टाळण्यासाठी गाडी दोनदा पुढे घ्यावी लागत होती. यात वेळ जात होता. तसेच प्रवाशांचा गोंधळ होत असे. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून येथील फलाटांची लांबी वाढविण्यात येत आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे.पुणे-मुंबई लोहमार्गावरील उद्योगनगरीतील महत्त्वाचे स्थानक म्हणून पिंपरीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी होती. मात्र फलाटांची लांबी कमी असल्याने असा थांबा देण्यात तांत्रिक अडचण असल्याची सबब रेल्वे प्रशासनाकडून पुढे करण्यात येत होती. त्यामुळे फलाटांची लांबी वाढविण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पिंपरीतील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या फलाटांच्या दोन्ही दिशेला लांबी वाढविली जात आहे. स्टेशनलगतच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालून चिंचवडच्या दिशेने फलाटाची लांबी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे पुलाला लागून मोरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचाही रेल्वे प्रवाशांना वापर करता येणार आहे. पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाºया प्रवाशांना पिंपरी स्टेशनकडे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध होता. मात्र फलाटाची लांबी वाढल्याने मोरवाडी चौकाकडे जाणारा मार्गही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे थेट रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवाशांना दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने नेता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी मोरवाडी चौकाकडे जाणारा पुलालगतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. तसेच पुलाखाली आणि परिसरात स्वच्छताही करण्यात येत आहे.

लोकलच्या फेºया नव्हे डब्यांमध्ये वाढपुणे-लोणावळा लोकलच्या फेºयांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने फेºयांऐवजी लोकलचे तीन डबे वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. असे असले तरी पुणे-लोणावळा दरम्यानच्या काही स्टेशनच्या फलाटांची लांबी कमी आहे. अशा फलाटांची लांबी वाढविण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. जेणे करून लोकलच्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

अपघातांना बसणार आळापिंपरी रेल्वे स्टेशन येथे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने शेकडो जणांचा मृत्यू झाला. याला आळा घालण्यासाठी येथे उपाययोजनेची मागणी करण्यात येत होती. स्टेशनला लागूनच भाजीमंडई आहे. तसेच दूध विक्रेते, फळ विक्रेते आणि फूल विक्रेते स्टेशनलगतच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. यातील बहुतांश जण पादचारी पुलाचा वापर न करता थेट लोहमार्ग ओलांडतात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. फलाटांची लांबी वाढल्याने रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबतील आणि अपघातांना आळा बसण्यास मदत होईल.स्वयंचलित जिनापिंपरी स्टेशन येथे प्रवाशांसाठी स्वयंचलित जिना उभारण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आदी प्रवाशांना जिना चढून जाणे सहज शक्य नसल्याने त्यांच्याकडून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रकार होत असे. अशा प्रकारांना आळा बसणार असून, स्वयंचलित जिन्यामुळे या प्रवाशांची गैरसोय टळली आहे.

चिंचवड स्टेशन प्रमाणेच पिंपरी येथेही २१ डब्यांच्या गाड्यांना थांबा देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच फलाटांची लांबी वाढविली पाहिजे. त्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.- गुलामअली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेlocalलोकलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड