शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन अवशेषासाठी प्रयत्न, बुजलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:05 IST

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.

पवनानगर - मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.तरी यासाठी पुरातन विभागाला बारा मावळा परिवारातील सदस्यांनी कळवले असून, जीर्ण झालेल्या वस्तू एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवण्यासाठी लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, यासाठी बारा मावळा परिवारातर्फे विनंती केली आहे. या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य महेश कदम, नवनाथ पायगुडे, किरण खामकर, महेंद्र फाले व वाघेश्वर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्या वेळी वाघेश्वर गावाचे व इतर अनेक गावांचे विविध ठिकाणी स्थलांतर करण्यात आले, तर वाघेश्वर गावाचे शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. गावामध्ये प्राचीन काळातील एक शंकराचे मंदिर होते, ते ज्या वेळी धरणामध्ये पाण्याची साठवणूक केली. त्या वेळी शंकराचे मंदिर पाण्यात बुडून गेले आहे; परंतु दर वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते त्या वेळी मंदिराच्या काही दुर्मिळ वस्तू जीर्ण अवस्थेत त्या ठिकाणी पहावयास मिळतात. त्यासाठी परिसरातील अनेक नागरिक दर्शनासाठी येतात.मंदिराचा गाभारा, मोडकळीस आलेला कळस, मंदिराच्या सभामंडपाचे अवशेष, मंदिर परिसरातल्या विरगळी आणिसमाध्या तर गाडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तर या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य बोलताना सांगत होते, की जसे किल्ल्याचा ठेवा आपण जपत असतो, तसा या मंदिराचा पण ठेवा जपण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नकरणार आहे.उन्हाळा आला की धरणातील पाणीसाठा कमी होतो. त्यानंतर वाघेश्वर मंदिराचे दर्शन घडते. परंतु, यातील पुरातन अवशेष याची जोपासना व्हावी यासाठी पुरातत्त्व विभागाकडे बारा मावळ संघटना पाठपुरावा करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या