चिंचवड: प्रेमलोक पार्क परिसरात विनापरवाना होत असलेली झाडांची कत्तल पर्यावरणप्रेमी महिलांनी थांबविली. झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या कामगारांना धारेवर धरले. झाडे छाटण्याची परवानगी नसतानाही या भागातील झाडे कोणाच्या परवानगीने तोडली जात आहेत याची विचारपूस केली.मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने या वृक्ष प्रेमींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.आणि अखेर विनापरवाना सुरु असलेली झाडांची कत्तल थांबविण्यात आली.चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का या बाबत चौकशी केली.मात्र, त्यांनी नवीन आयुक्तालयाच्या तयारीसाठी आम्ही झाडांच्या फांद्या छाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या भागातील काही झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथील रहिवाशांनी उघड केला. नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासन व चिंचवड पोलिसांना घटनास्थळी बोलाविले. झाडे तोडण्यासाठी आलेली वाहने,कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:57 IST
चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का याबाबत चौकशी केली.
चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल
ठळक मुद्देझाडे तोडण्यासाठी आलेली वाहने,कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी