शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिला वळल्या पुन्हा पारंपरिक चुलीकडे; गॅस दरवाढीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:50 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काहीशी कपात होत आहे. मात्र गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

- प्रकाश गायकर

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काहीशी कपात होत आहे. मात्र गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उद्योगनगरीसह मावळच्या ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये गॅसचा दर ९३४ रुपये झाला आहे. परिणामी गृहिणींच्या दर महिन्याच्या बजेटमध्ये वाढ होत आहे.

एप्रिल महिन्यापासून गॅसच्या दरात तब्बल २८७ रुपयांची घसघसीत वाढ झाल्यामुळे शहरवासीयांना महागाईची झळ बसू लागली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढत असून, नोव्हेंबर महिन्यामध्ये सिलिंडरचा दर ९४० चा आकडा पार करण्याची शक्यता आहे. एवढा महागडा सिलिंडर खरेदी करताना उद्योगनगरीसह मावळ भागातील गृहिणींच्या बचतीला कात्री लागली आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आपुलकी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोजच्या भाववाढीने त्याचे योग्य फलीत झाले नसल्याचे दिसून येते. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनताही मेटाकुटीस आली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला हजार रुपयाच्या आसपास पैसे देऊन गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहेत. त्यामुळे चूलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.मावळात पाहुण्यांच्या चहासाठीच गॅसउज्ज्वला योजनेच्या सुरुवातीला सिलिंडरची किंमत ६०० रुपये होती. त्या वेळी ग्रामीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करत होते. मात्र आता सिलिंडरचा भाव साडेनवशे रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे केवळ पाहुणा आल्यास चहा करण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा नागरिकांनी गॅस भरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये केवळ रिकाम्या गॅसच्या टाक्या दिसत आहेत.भाववाढीने चाकरमान्यांचे हालशहरी भागातील महिलांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. अनुदानाची रक्कम जास्त प्रमाणात जमा होत असल्याचे सांगितले जात असले तरी ती रक्कम अतिशय थोड्या प्रमाणात जमा होते. गॅस सिलिंडर खरेदी करतेवेळी एवढे पैसे मोजावे लागत असल्यामुळे हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांची चांगलीच गोची होत आहे. सिलिंडरची भाववाढ अशीच सुरू राहिल्यास शहरातील कुटुंबांनाही पुन्हा चुलीकडेच वळण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरFuel Hikeइंधन दरवाढ