शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 20:54 IST

लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन झाला होता स्फोट

ठळक मुद्देदुर्घटनेत जखमी झालेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू

पिंपरी : सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे. भोसरी येथे बुधवारी (दि. ४) सकाळी पावणेसातच्या सुमारास स्फोट झाला होता. मनीषा ज्ञानेश्वर साळुंखे (वय ३५,रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा या दिघी रस्ता येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. तर, त्यांचे पती ज्ञानेश्वर साळुंचे हे चाकण येथील एका कंपनीत नोकरी करतात. साळुंखे यांच्याकडे दोन सिलींडर आहेत. त्यापैकी एका सिलींडरमधील गॅस संपल्याने साळुंखे यांनी मंगळवारी रात्रीच गॅस भरलेला सिलींडर शेगडीला जोडला. रात्री सिलींडरमधून गॅसगळती झाली. बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा गंभीररीत्या भाजल्या. तसेच त्यांचे पती ज्ञानेश्वर हे देखील यात भाजले. तर त्यांचा १३ वर्षांचा मुलगा सिद्धेश किरकोळ जखमी झाला होता.

टॅग्स :bhosariभोसरीCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल