पिंपरी : वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून महिलेला तिच्या बालमित्राने हॉटेलमध्ये बोलविले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरणही केले. ही घटना २ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत हिंजवडी आणि नर्हे येथे घडली.३ ३ वर्षीय मित्राची ३१ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. ७) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फिर्यादी महिलेच्या बालपणीचा मित्र आहे. त्याने २ डिसेंबर २०२२ रोजी महिलेला फोन करून तुला वाढदिवसाचे सरप्राइझ द्यायचे आहे, असे सांगून वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने हिंजवडीतील हॉटेल श्री इन येथे बोलविले. त्यानंतर महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराची चित्रफित काढली.ही चित्रफित तुझ्या नातेवाईकांना दाखवेल, अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यातून ती महिला गरोदर राहिली असता तिला पोवई नाका, सातारा येथे नेऊन तिची सोनोग्राफी व त्यानंतर गर्भपात केला. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर पुन्हा वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेने विरोध कला असता त्याने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातून जाताना दीड तोळ्याची सोनसाखळी घेऊन गेला.
'तुला वाढदिवसाचे सरप्राइझ द्यायचे' असं म्हणत बालपणीच्या मित्राकडून महिलेवर अत्याचार
By नारायण बडगुजर | Updated: February 8, 2025 15:09 IST