शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुकाराम मुंढेंकडून न्याय मिळेल का ?, रिअलायमेंट अहवालासाठी गती देण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:23 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.

रावेत : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. शहरात मागील पाच महिन्यांपासून रिंगरोड संदर्भी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.प्राधिकरणाचा सर्वांत मोठा व चिघळलेला प्रश्न म्हणजे रिंगरोड. या प्रश्नालाही तुकाराम मुंढे मार्गी लावतील, अशी आशाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे प्राधिकरणाच्या कामकाजाला कशा पद्धतीने वेग देतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्राधिकरणदरबारी रिंगरोडविरोधात समितीने शांततेच्या मार्गाने अनेक प्रकारे जनआंदोलन केली. या आंदोलनाची दखल प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष मुंढे लक्ष घालून शहरात जटिल बनलेला प्रश्न मार्गी लावतील का, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी समितीला आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. हे येणारा काळच ठरवेल.पाटील म्हणाले, त्याचप्रमाणे १०० फुटांवरच ४५ मीटरचा स्पाइन रोड असताना व ५० मीटरचा रावेत-पुनवळे रोड काही मीटर अंतरावर अस्तित्वात असताना सदरचा एचसीएमटीआर ३० मीटर रस्ता दाट लोकवस्तीतून बनवणे घटनाबाह्य वाटते. तसेच हजारो लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून बेघर करणे, २५००० लोकांचासंसार उद् ध्वस्त करणेराष्टÑहिताचे नाही. तसेच चुकीच्या कारवाईमुळे स्वकष्टातून उभारलेली हजारो घरे पाडणे म्हणजे राष्टÑीय संपत्तीचे नुकसानच आहे. कालबाह्य आराखडा राबविणे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही.’’समन्वयक विजय पाटील म्हणाले, ‘‘२१ जुलै २०१७ रोजी अनधिकृत घरे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानंतर ७ आॅक्टोबर २०१७ रोजी सुधारित बाबी समाविष्ट करून त्याचे कायद्यात रूपांतर झाले. त्यामुळे ‘रिंगरोड’बाधितांना घरे अधिकृत होण्याची मोठी आशा निर्माण झाली. गेली ३० वर्षे हक्काच्या घरासाठी सदरचे ३००० रहिवासी वाट पाहत होते. सुधारित नियामावलीमध्ये प्राधिकरण आणि महानगर विभागाचा समावेश केल्यामुळे प्राधिकरणामधील २२००० अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लागू शकेल. गेल्या ३५ वर्षांमध्ये विकास आराखड्याचे पुनरावलोकन होणे आवश्यक आहे. त्याकरिता पुन:सर्वेक्षण विकास आराखडा समितीची नियुक्तीसुद्धा झाली आहे.’’

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड