शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून; पतीला सात दिवसांची पोलिस कोठडी

By नारायण बडगुजर | Updated: June 22, 2024 17:45 IST

देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची ही घटना घडली....

पिंपरी : ओढणीने गळा आवळून पत्‍नीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. त्याना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची ही घटना घडली.

प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१), असे खून झालेल्‍या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती जयदीप अर्जुन यादव (वय २९, रा. देहूगाव, मूळ रा. चिखलगोळ, जि. सांगली) याला पोलिसांनी अटक केली. पोलिस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) देहूरोड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यादव हे दोन महिन्यांपूर्वी विवाहबंनधानत अडकले. प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसस्सीपर्यंत तर जयदीप हा अभियांत्रिकी शाखेतील पदविकाधारक (डिप्लोमा) आहे. जयदीप हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी ते देहूगाव येथे राहण्यासाठी आले होते.  

पत्‍नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही. तसेच तिचे अनैतिक संबंध असल्‍याचा संशय जयदीप याला होता. दरम्यान, प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला गेले. तेथे ओढणीने गळा आवळून जयदीप याने तिचा खून केला. तसेच गुन्‍हा लपविण्‍यासाठी तिचा व स्‍वतःचा मोबाइल घटनास्‍थळा जवळील इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuroadदेहूरोड