शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आईच्या मृत्युला कोण जबाबदार ? आयसीयुमध्ये जागा असताना देखील उपचार केलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 18:57 IST

पिंपरी चिंचवडमधील एका बड्या रुग्णालयातील प्रकार

ठळक मुद्देसहा लाखांंची शस्त्रक्रिया दुसऱ्या रुग्णालयात केली 37 हजारांत 

पिंपरी : आठवड्यातून तीन वेळा आईला डायलिसीससाठी 'त्या' रुग्णालयात घेऊन जायचो. चार वर्ष डायलिसीस सुरू होते. शनिवारची गोष्ट वेगळी होती. आईला जुलाब, उलट्यांचा त्रास सुरु झाला. यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला. डॉक्टरांनी आयसीयुमध्ये भरती करण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्याची अट घातली. त्याशिवाय ते आयसीयु मध्ये दाखल करुन घेण्यास राजी नव्हते. ती चाचणी होण्यापूर्वी आईचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रुग्णालयाच्या बदलत्या नवीन नियमावलीचे व धोरणाचे कारण पुढे केले. मात्र या सगळयात माझ्या आईचा जीव गेला. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न मुलाने रु ग्णालय प्रशासनाला विचारला आहे.              आदित्य परब (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची आई सविता अर्जुन परब (वय 56) या गेल्या चार वर्षांपासून एका खासगी रुग्णालयात डायलिसीस करुन घेत होत्या. शनिवारी देखील नेहमीप्रमाणे त्या उपचार करुन घेण्यासाठी आल्या होत्या. या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना आदित्य म्हणाला, त्यावेळी त्यांना 2016 पासून आईला उपचारासाठी त्या ह्यबडयाह्ण रुग्णालयात नेत असु. शनिवारी देखील त्यांना नेले असताना तिला जुलाब व उलट्यांचा त्रास सुरु झाला. यात रक्तदाब वाढला. डॉक्टरांनी आयसीयु मध्ये दाखल करावे लागेल असे सांगताना कोरोनाची चाचणी करावी लागेल. असे सांगितले. यात त्यांनी पेशंटला डिस्चार्च देखील दिला. वास्तविक आई लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्याच रुग्णालयात डायलिसीससाठी जात होती. त्यावेळी डॉक्टरांनी कोरोना चाचणी विषयी विचारणा केली नव्हती. परंतु आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला आयसीयुमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्याऐवजी त्यांनी नियमांवर बोट ठेवले. 

कोरोना तपासणी केल्याशिवाय रुग्णाला आयसीयुमध्ये नेणार नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. त्यानंंतर लहान भाऊ अजिंक्य परब याच्याकडे डिस्जार्ज दिल्याची कागदपत्रे देण्यात आली. जो रुग्ण चार वर्षांपासून ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे तेथील डॉक्टरांना त्याची 'हिस्ट्री' माहित नाही असे कसे असु शकेल? असा प्रश्न अजिंक्यने रुग्ण प्रशासनाला विचारला आहे. 

.................................

 सहा लाखांंची शस्त्रक्रिया दुस-या रुग्णालयात केली 37 हजारांत आईच्या उपचारात डॉक्टरांक डून जो हलगर्जीपणा झाला त्याबद्द्ल पोलिसांत तक्रार देणार आहे. सर्वसामान्य माणसांना नाडण्याचे काम अनेक मोठी रुग्णालये करत आहेत. पैसे माणूस उभे करेल पण तोपर्यंत उपचार सुरु ठेवा. उपचारासाठी रुग्णालयात जागा असताना उगाचच नियम व धोरणांवर बोट ठेवणे चुकीचे आहे. यापूर्वी देखील आईच्या शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णालयात विचारणा केली होती. शस्त्रक्रियेचा खर्च 4 ते 5 लाख, आयसीयुचे दर, नर्सिंगचे दर आणि इमर्जन्सी काळात दाखल करुन घेतले याचे वेगळे दर असा एकूण सहा लाख खर्च सांगितला. हीच शस्त्रक्रिया औंध मधील एका रुग्णालयात 37 हजारांत केल्याचे आदित्यने सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू