शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी?

By admin | Updated: May 11, 2015 06:09 IST

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी जकात नाका दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

देवराम भेगडे

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी जकात नाका दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, आणखी किती बळी गेल्यावर महामार्गाचे रुंदीकरणाला मुहूर्त लागणार? रुंदीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाकडून निविदा प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाचे आदेश देण्यात येणार असल्याने साधारणपणे एप्रिलअखेर काम सुरू होणार असल्याचे संबंधित अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले होते. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या सदस्य शपथविधी व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी फेब्रुवारीत आमदार बाळा भेगडे यांनी १ एप्रिलला चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे जाहीर केले होते. रस्ते विकास महामंडळाने महामार्ग क्रमांक चारचा निगडी ते शिळफाटा (ठाणे) हा किलोमीटर क्रमांक २०/४०० ते १३१/२०० दरम्यानचा रस्ता म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे ९ आॅगस्ट २००४ ला झालेल्या करारानुसार ‘ बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यासाठी देण्यात आला होता. सदर रस्त्याचे विविध ठिकाणी कामे अपूर्ण असताना सप्टेंबर २००६पासून या महामार्गावर टोलवसुली सुरू केली आहे. निगडी जकात नाका ते देहूरोड पोलीस ठाण्यापर्यंतच्या सव्वासहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. निगडी ते देहूरोड या दोनपदरी अरुंद रस्त्याचे केवळ डांबरीकरणाचे काम झाले आहे. देहूरोड ते निगडी महामार्ग खूपच अरुंद असल्याने, तसेच महामार्गाच्या संरक्षक साइडपट्ट्या व मुख्य डांबरी रस्ता यात अंतर असल्याने दुचाकीस्वारांचे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून, शंभराहून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या अरुंद रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होतच आहेत. देहूरोड बाजारपेठ परिसरात महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, अद्यापही रस्त्यालगत राडारोडा पडलेला आहे. स्वामी विवेकांनद चौक व जुन्या बँक आॅफ इंडिया चौकातही सातत्याने अपघात आणि वाहतूककोंडी होत आहे. दोन्ही ठिकाणी भुयारी मार्ग उभारणी, देहूरोड लोहमार्ग ते डॉ. आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी वेळोवेळी झाली आहे. अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सकरात्मक दृष्टिकोन ठेवून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून निधीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्याय म्हणून द्रुतगती महामार्ग उभारणी झाल्यानंतर या महामार्गावरील बहुतांशी वाहतूक कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, दिवसागणीक वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येने तो फोल ठरवला आहे. त्यामुळे रुंदीकरण गरजेचे आहे. ---------राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना मागील दहा वर्षांत निगडी-देहूरोडदरम्यानच्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्याबाबत अनेकदा सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले होते. मात्र, आवश्यक निधी न मिळाल्याने रुंदीकरण होऊ शकले नव्हते. गेल्या वर्षी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून हवा असणारा निधी उपलब्ध होणार असल्याचे संबंधित पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.