पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून शहरात कमाल तापमानात वाढ झाली असून, शनिवारी (दि. ११) तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कडक ऊन आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या असह्य उकाड्याने पिंपरी चिंचवडकर हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने कमाल तापमानाचा पारा ३५ अंशाच्या खाली आला होता. मात्र निरभ्र आकाश आणि कमाल तापमानातील वाढ यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे.महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत जातो. मात्र, शनिवारी (दि. ११) एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा ४० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सूर्य आग ओकत असल्याने घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, छत्रीचा वापर केला जात असून, थंड पेय घेण्यासाठी पावले शीतपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत. विवाजीनगर येथे ३९ अंश सेल्सिअस तर लोहगाव मध्ये ४०.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पाच ते सहा दिवस कडक ऊन, कोरडे हवामान कायम राहणार आहे. काय काळजी घ्याल?दुपारी १२ ते ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा.भरपूर पाणी प्या.कडक उन्हात बाहेर पडताना डोके झाकून ठेवा.
मावळातही उन्हाचा त्रासपुढील दोन ते तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. मावळ तालुक्यात दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन पडत आहे, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शाळांनी सकाळच्या सत्रात शाळा सुरू आहेत.