शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कोणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देणार नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 14:06 IST

आज पिंपरी चिंचवड अजित पवार दौऱ्यावर आहेत...

पुणे/पिंपरी :जगातील अर्थव्यवस्थांचा विचार केला तर सध्या आपण टॉप पाचमध्ये आहोत. पुढे आपल्याला टॉप तीनमध्ये स्थान मिळवायचे आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. देशाची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलीयन डॉलरवर आपल्याला न्यायची आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्र भविष्यात मोठे काम करणार आहे. यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. भविष्यातील भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत.

पुढे बोलताना पवार म्हणाले, कोणत्याही आरोप-प्रत्यारोपाला आम्ही महत्त्व देणार नाही. आम्ही आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची चर्चा सुरू आहे. राज्यातील उद्योगधंदे कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विकासाची कामे करत असताना इतरांनी कोणत्याही बातम्या पसरवणे बंद केले पाहिजे. अर्थव्यवस्था सुधारली तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. कृषी, शेती, आयटी आणि इतर क्षेत्रातील वाढीसाठी प्रयत्न असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आढावा घेतला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्ग काढला जाणार आहे. स्मार्ट सिटी अभियानावरही चर्चा केली जाणार आहे. शहराचे वाढते विस्तारीकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी बोलणार आहे. त्या नवीन भागाला सर्व पायाभूत सुविधा आणि पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

पवार म्हणाले, केंद्राचा निधी राज्याला जास्तीत जास्त मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील स्वागताने मी भारावलो आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यावर विचारले असता अजित पवारांनी 'नो कमेंट्स' असं उत्तर दिले. मी फक्त आता फक्त विकासावर बोलणार आहे, त्यावर मला प्रश्न विचारा असं पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था