शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन शून्य कामामुळे पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:00 IST

नागरिक संतप्त,प्रशासन हतबल

ठळक मुद्देरस्त्याचे खोदकाम करताना अनेकदा पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी

चिंचवड: पाणी पुरवठा यंत्रणेच्या नियोजनात असफल होत असलेल्या महानगर पालिका प्रधासनाच्या विरोधात नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत. पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करणाऱ्या पालिकेच्या 'ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालया सामोर आज लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा प्रकार घडला आहे.पाईप लाईन फुटल्याने डोळ्यासमोर पाणी वाहत असताना प्रशासन हतबल झाल्याने नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.पाण्यासाठी शहरात नियोजन करण्यात येत आहे.सोमवार पासून दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी चिंचवड मधील उद्योग नगरातील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खोदकामामुळे पाईपलाईन फुटून आज पहाटे पासून पाणी रस्त्यावर वहात होते.या वेळी आज कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मात्र येथील पाणी गळती थांबविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत.यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.उद्योगनगर भागात तीन दिवसांपासून अंतर्गत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे.या कामामुळे याज प्रभाग कार्यलयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे दिसून आले.रस्त्यावर वाहणारे पाणी पाहून नागरिक संतप्त व्यक्त करीत होते. मात्र पालिका प्रशासनाला या बाबत गांभीर्य नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.रस्त्याचे खोदकाम करताना अनेकदा पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी होत असल्याचे प्रकार घडत असतात.मात्र पालिका प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणी बचतीसाठी ज्ञान वाटणाऱ्या पालिका प्रशासनने स्वत: नियोजनात तत्पर राहावे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.फोटो:चिंचवड मधील 'ब प्रभाग' क्षेत्रीय कार्यालया समोर पाण्याची पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी