शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:38 IST

पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे होळी या सणाच्या दिवशीच महानगरपालिका परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. होळी सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सणाचा दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत व शोधात गेला.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. त्यानंतर रावेत येथील बंधाऱ्यातून जलउपसा केला जातो. येथे महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्र उभारले आहे. पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी रावेत येथील बंधाऱ्याची पाण्याची पातळी कमी झाली. धरणातून बंधाºयात येणारे पाणी कमी झाल्याने जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. त्यामुळे शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाही. परिणामी मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात सायंकाळी सहाला येणारे पाणी रात्री अकरानंतर सोडण्यात आले होते. तर होळीच्या दिवशीही शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालखंड लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.कमी वेळ पाणी सोडल्याचा परिणामविद्युत निर्मिती करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्याने दररोज सुमारे सहा ते सात तास पाणी सोडण्यात येते. ते पाणी दोन ते तीन तास सोडण्यात आले. परिणामी रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली. धरणातून कमी वेळ पाणी सोडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी शहराच्या विविध भागांत होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. परिणामी नागरिकांना सणाच्या दिवशीच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. सणाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.पवना धरणाच्या विद्युत निर्मिती संचामध्ये बिघाड झाल्याने रावेत बंधाºयातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे जलउपसा करणारे पंप बंद करावे लागले. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. तसेच बुधवारीही याचा परिणाम जाणवला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड