शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच पाणीटंचाई : सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:58 IST

मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देशहरातील करदात्या नागरिकांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे कर्तव्य

पिंपरी : पाणीटंचाईप्रश्नी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर हल्लाबोल केले आहे. शहरात प्रशासनाकडूनच कृत्रिम पाणीटंचाई असल्याने अकार्यक्षम,कामचुकार अधिकारी व ठेकेदारांमुळे पाणी नियोजन कोलमडले. पाणी समस्येला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नगरसवेक उत्तम केंदळे यांनी केला आहे.महापालिकेचे शहरातील करदात्या नागरिकांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे कर्तव्य आहे. मागील काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाले आहे. पवना धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असतानादेखील अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. शहरात नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक सल्लागार महापालिकेने आतापर्यंत नेमले. स्काडा आणि चोवीस पाणीपुरवठा योजना राबविली. दरवर्षी पाणीपुरवठा करण्यासाठी करोडो रुपये महापालिका तिजोरीतून खर्ची पडत आहेत. नगरसेवक केंदळे म्हणाले, शहरवासीयांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. यावरून महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत आहे. पुढे विधानसभा निवडणूक असल्याने अकार्यक्षम, कामचुकार अधिकारी व ठेकेदार संगनमताने पाणीपुरवठा नियोजनात गोंधळ घालतात. वेळच्या वेळी दुरुस्ती कामे करत नाही आणि त्यामुळे अशा समस्याना तोंड द्यावे लागते़ आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले असताना नागरिकांना या प्रकारे पाण्यासाठी वेठीस धरण्याचा सगळा उद्योग सुरू आहे.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत पाणीपुरवठा नियोजनाच्या नावाखाली दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. कामे काढली जातात. मग ही कामे कोणासाठी काढली जातात व कुठे जातात अधिकारी आणि ठेकेदार संगंमताने कामामध्ये गोंधळ घालतात. केवळ लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक कारणे सांगून प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नकार देत आहे.  नियोजनाअभावी आता पुन्हा महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबींवरून पाणीपुरवठा नियोजनात ज्या पद्धतीने घोळ घातला जात आहे. त्याच पद्धतीने पाणीपुरवठा विभागाच्या कारभारातही आहे. त्यामुळे आयुक्तांनी लक्ष्य घालून पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची चौकशी करावी. स्मार्ट सिटीमध्ये समावेश असणारी महानगरपालिका नागरिकांची मूलभूत गरज भागवू शकत नाही तर आयुक्तांनी बाकीच्या प्रकल्पांऐवजी पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यामध्ये दोषी व कामचुकार आढळून येणाºयांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीshravan hardikarश्रावण हर्डिकर