मोशी येथील स्पाईन रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:54 PM2020-08-25T17:54:39+5:302020-08-25T17:56:34+5:30

मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली...

The water pipeline break on Spine Road in Moshi; Thousands of liters of water were wasted | मोशी येथील स्पाईन रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी गेले वाया

मोशी येथील स्पाईन रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी गेले वाया

Next

पिंपरी : मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र लागलीच दुरुस्ती करण्यात येऊन गळती थांबविण्यात आली. मोशी येथे स्पाईन रस्त्यावर स्पाईन सिटीजवळ मंगळवारी दुपारी ही गळती झाली.
महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मलनिस्सारण वाहिनी बदलणे, दुरुस्ती करणे, नवीन वाहिनी टाकणे आदी कामे केली जात आहेत. त्याच अनुषंगाने क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रस्त्यावर स्पाइन सिटी परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू आहे. या वाहिनीचे काम करताना मंगळवारी दुपारी येथील जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागला. यात जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया गेले. त्यामुळे येथे बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच रस्त्यात व परिसरात पाणीच पाणी झाले होते. 
भोसरी येथील पांजपोळ येथे असलेल्या मुख्य जलकुंभाची ही महापालिकेची मुख्य जलवाहिनी आहे. या जलकुंभातून या परिसरात महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. सायंकाळी उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.

मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीमुळे जलवाहिनी फुटली. मात्र त्याची लागलीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पांजरपोळ जलकुंभावरील होणाºया पाणीपुरवठ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. वेळेत व नियमित दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.
- अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी, क क्षेत्रीय कार्यालय

गळती : मोशी येथे स्पाईन रस्त्यावर मंगळवारी दुपारी जलवाहिनी फुटून गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले.

Web Title: The water pipeline break on Spine Road in Moshi; Thousands of liters of water were wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.