शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड परिसरातील जलवाहिनी फुटली; मोशी, चऱ्होलीचा पाणीपुरवठा बंद

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 11, 2024 15:26 IST

भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे....

पिंपरी : शहराच्या पुर्व भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरूवारी सकाळी ११ च्या सुमारास अचानक फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. पाणी उपसा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे भोसरी, मोशी, चऱ्होली आदी भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गुरूवारी सायंकाळी अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांनी दिली.जलवाहिनी फुटल्याची बाब लक्षात येईलपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाणी उपसा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या टीमने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. जलवाहिन्या दुरूस्त झाल्यांनतरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या भागांतील पाणीपुरवठा बंदचऱ्होली, मोशी, डूडूळगाव, बोऱ्हाडेवाडी, चोवीसवाडी, वडमुखवाडी, देहू रस्ता, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी नगर, सद्गुरूनगर, प्राधिकरणातील सेक्टर नंबर ४, ६, ९, ११, १३ येथील पाणीपुरवठा बंद झाला आहे.

जलवाहिनी फुटल्याने शहरातील पुर्व भागाकडे या वाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा काही गुरूवारी बंद करण्यात आला. दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर वाहिनीद्वारे शहरातील टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येईल. टाक्या लगेच भरणार नाहीत. त्यामुळे किमान दोन दिवस शहरातील पुर्व भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे विस्कळित राहतील.- अजय सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महापालिका

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी