शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकट टळले - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:13 IST

पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी : पवना धरणात यंदा पाणीसाठा पुरेसा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नाही. तसेच २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नदीतून रावेत येथील बंधाऱ्यातपाणी येते. तेथून जलउपसा केंद्रातून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. दिवसाला ४६० एमएलडी एवढे शहरासाठी पाण्याचे आरक्षण आहे. नागरीकरण वाढू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत.उन्हाळा तीव्र असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची कपात केली जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सूचित केले होते. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट येणार हे निश्चित होते. मात्र, महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीकपातीला विरोध केला होता. पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना केल्या होत्या. सध्या पवना धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा २९ टक्के होता. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाणीकपात झाली होती. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन यंदा कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. या वर्षी पुरेसा साठा असल्याने पाणीकपातीचे संकट या वर्षी नसणार आहे, असे प्रशासनाने सूचित केले आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने अर्थात एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पाणी वापरासंदर्भात एमआयडीसीने महापालिकेस सूचना केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाणी बचत करा अन्यथा कपात करावी लागेल, असे पत्र महापालिकेला दिले होते. त्यामुळे पाणीवापराचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.पवना धरणात यंदा पाण्याचा साठा पुरेसा आहे. नियमित पाणी पुरवठ्यानुसार सध्याचा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्याची किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही. २४ तास पाणी योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भागाचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीगळती रोखून नागरिकांना पुरेसे पाणी देता येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड