शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:09 IST

पिंपरी-चिंचवडसाठी साठ एमएलडी पाणी कमी उपसा करावा, याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी साठ एमएलडी पाणी कमी उपसा करावा, याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. मात्र, महापालिकेने त्यांवर निर्णय घेतलेला नाही. पुण्यात पाणी कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर पिंपरीकरांच्या पाण्यावरही संक्रात येऊ शकते.पाणी उपसाविरोधातील निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने केलेले अपिल जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पुणे महापालिकेवर आली आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेवरही पाणीकपातीचे संकट आहे.पवना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे परतीचा पाऊस झाला नाही. धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पालिकेने पाचशे एमएलडी उपसा न करता ४४० एमएलडी पाणी उचलावे. पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने पालिकेस नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाठविले आहे. मात्र, अद्यापही महापालिकेने पाणी उपसा कमी केलेला नाही. पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतर नियोजन अपेक्षित होते़ मात्र, महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दररोज सुमारे पाचशे एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यातून उपसा करीत आहे. पाणीकपात प्रशासनाने सूचविली आहे. मात्र, याबाबत धोरण ठरविण्यात सत्ताधाºयांमध्येच एकमत होत नसल्याचे चित्र आहे. त्यात विरोधकांच्याही विरोधाची भर पडली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे पाटबंधारे विभागाचे आदेश तर दुसरीकडे राजकीय विरोध अशा कात्रीत पालिका प्रशासन सापडले.पवना धरणातील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल अकरा टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षी ८५ टक्के पाणी साठा होता. तर, यंदा ७४ टक्के साठा शिल्लक आहे. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असले तर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.- प्रवीण लडकत,कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड